Shetkari Dakhla Kasa Kadhaycha: शेतकरी असाल तर हा शेतकरी दाखला त्वरित काढा जाणून घ्या फायदे

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊयात की Shetkari Dakhla Kasa Kadhaycha आपल्या भारत देशात शेती खूप मोठ्या प्रमाणात होते कारण आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून संपुर्ण जगात ओळखला जातो.

Shetkari Dakhla Kasa Kadhaycha: शेतकरी असाल तर हा शेतकरी दाखला त्वरित काढून घ्या पहा फायदे ?
Shetkari Dakhla Kasa Kadhaycha

अनुक्रमणिका

शेतकरी सरकारी योजना तसेच इतर माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा..

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा शेतकरी असल्याचे दाखला काढायचा असेल तर हे दाखले कसे काढायचे आणि Shetkari Dakhla Online काढण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.

पिक विमा 2023-24 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

Shetkari Dakhla Kasa Kadhaycha | शेतकरी दाखला कसा काढावा?

शेतकरी मित्रांनो हे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले पोर्टल आहे त्यावर पण सहजासहजी मिळून जाते किंवा तुम्ही तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात जाऊन पण काढू शकता. तुम्हाला जिथून जमेल तिथून तुम्ही Shetkari Dakhla काढू शकता.

पुढील लिंक वरती क्लिक करून तुम्ही शेतकरी प्रमाणपत्र अत्यंत सोप्या पद्धतीने काढू शकता. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही Shetkari Dakhla म्हणजेच शेतकरी प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

शेतकरी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकरी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकरी दाखला काढण्यासाठी खाली दिलेली निम्नलिखित कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे –

 • मतदान कार्ड
 • पॅन कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • रोजगार हमी योजना चे ओळखपत्र
 • पासपोर्ट फोटो
 • आधार कार्ड
 • सरकारकडून मिळालेले जे ओळखपत्र असतात त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र.
 • इतर कागदपत्रे
 • शेतकरी असल्याचा दाखला घेण्याकरिता जमिनीचा 8अ उतारा किंवा सातबारा तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे.
 • तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता सांगणारा पुरावा असणे आवश्यक आहे.
 • रेशन कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट
 • मतदान कार्ड
 • यांच्यापैकी कोणतेही एक कागदपत्र पाहिजे.

स्वयंघोषित प्रमाणपत्र कसा भरावा?

शेतकरी असल्याचा दाखला मिळवण्याकरिता स्वयंघोषित प्रमाणपत्र भरणे गरजेचे असते आणि हे सर्वांनाच भरावे लागते आपण अर्ज करते वेळेस अर्जासोबत हे भरून देणे गरजेचे असते.

Certificate Apply Process |आपले सरकार या पोर्टल वरून अर्ज कसा करावा ?

 • शेतकरी दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम आपले सरकार या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले मोबाईल नंबर व Email I’d टाकून तिथे लॉगिन करून घ्यायचं आहे.
 • यानंतर पेज लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर विविध विभाग बघायला मिळतील त्यामधून तुम्हाला महसूल विभाग या पर्यायाचा निवड करायचा आहे.
 • यानंतर तुमच्यासमोर शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.
 • शेतकरी प्रमाणपत्र पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कागदपत्रांची यादी दिसेल त्या कागदपत्रांची यादी सविस्तरपणे चांगली वाचा.
 • समोरील स्क्रीनवर दाखवलेली कागदपत्राच्या यादी प्रमाणे तुमची कागदपत्रे तयार ठेवा ती कागदपत्रे तुम्हाला पोर्टलवर अपलोड करावे लागतील.
 • जी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत ती कागदपत्रे ही 75kb ते 500kb एवढीच असावी.
 • स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करा तसेच तुम्हाला तिथे तुमची सही व फोटो सुद्धा अपलोड करणे गरजेचे असते मग पुन्हा सर्व झाल्यानंतर अर्ज सादर करून घ्या.
 • अर्जाला लागणारा जो शुल्क असतो तो तिथेच ऑनलाईन भरायचा असतो आणि मिळालेली पावती आपल्याकडे सांभाळून ठेवा.

शेतकरी प्रमाणपत्र किती दिवसात मिळेल?

शेतकरी दाखला किती दिवसात मिळतो
शेतकरी दाखला किती दिवसात मिळतो

शेतकरी दाखला तुम्हाला आपले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळून जाईल. जर काही अडचण आली प्रमाणपत्र मिळण्याकरिता तर पंधरा दिवस झाल्यावर त्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून घेऊन तुम्ही तिथे Appeal सुद्धा करू शकता.

शेतकरी सरकारी योजना तसेच इतर माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा..

FAQ’s- शेतकरी दाखला संबंधी प्रश्न उत्तरे

चला जाणून घेऊयात शेतकरी दाखल्यासंबंधी लोकांव्दारे विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे –

Q.1- शेतकरी दाखला काढण्यासाठी अर्ज कुठे करावा?

Ans- शेतकरी दाखला काढण्यासाठी तुम्ही https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या अधीकृत संकेतस्थळाला जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन शेतकरी दाखला काढण्यासाठी अर्ज करू शकता.

Q.2- शेतकरी दाखला किती दिवसात मिळतो?

Ans- शेतकरी दाखला तुम्हाला आपले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळून जाईल. जर काही अडचण आली प्रमाणपत्र मिळण्याकरिता तर पंधरा दिवस झाल्यावर त्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून घेऊन तुम्ही तिथे Appeal सुद्धा करू शकता.

Q.3- स्वयंघोषित प्रमाणपत्र कसा भरावा?

Ans- शेतकरी असल्याचा दाखला मिळवण्याकरिता स्वयंघोषित प्रमाणपत्र भरणे गरजेचे असते आणि हे सर्वांनाच भरावे लागते आपण अर्ज करते वेळेस अर्जासोबत हे भरून देणे गरजेचे असते.

Q.4- शेतकरी दाखला काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

Ans- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रोजगार हमी योजनेचे ओळखपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना सोबत पाहिजे.

निष्कर्ष:

शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Shetkari Dakhla Kasa Kadhaycha या बद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर केली आहे. शेतकरी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे आम्ही आपल्यासोबत शेअर केली आहे.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमच्या द्वारे दिलेली माहितीचा उपयोग झाला असेल तर तुम्ही या लेखाला आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा.धन्यवाद🙏

हे पण वाचा 👇🏻