Kadba Kutti Machine Scheme | कडबा कुट्टी मशीन योजना 2024

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण Kadba Kutti Machine Scheme या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.पशुपालन करणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राला कडबा कुट्टी मशीन ही अत्यंत अत्यावश्यक असते. शेतकऱ्यांकडे जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे काम कष्टाचे काम आहे त्यामुळे सरकारने Kadba Kutti Machine Scheme योजना सुरु केली आहे.

सध्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई म्हशी किंवा इतर जनावरांचे प्रमाण जास्तच असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे गाई गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांच्या चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते आणि चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात. हे सर्व बाबी विचारात घेऊन आपल्या या सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरु केली आहे.

हे पण वाचा: सर्व सरकारी योजनांची माहिती एकाच लेखामध्ये बघा

Kadba Kutti Machine Scheme | कडबा कुट्टी मशीन योजना 2024
Kadba Kutti Machine Scheme | कडबा कुट्टी मशीन योजना 2024

Kadba Kutti Machine Scheme योजने अंतर्गत किती अनुदान मिळते?

कडबा कुट्टी मशीन या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत –

 • आधार कार्ड (Aadhar Card)
 • पॅन कार्ड (Pan Card)
 • सात बारा (7/12)
 • बँक पासबुक (Bank Passbook)
 • 8 अ उतारा

कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे (Scheme Benefits)

कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत –

 • कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
 • अत्यंत कमी वेळात भरपूर चारा कापण्यात मदत होते.
 • कुट्टी मशीन द्वारे चारा बारीक केल्याने जनावरांना तो चार खाण्यास सोपा जातो.
 • कुट्टी मशीन द्वारे चारा बारीक होतो आणि चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
 • चाऱ्याची नासाडी कमी होते.

Kadba Kutti Machine योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Kadba Kutti Machine योजनेसाठी अर्ज कसा करावा
Kadba Kutti Machine योजनेसाठी अर्ज कसा करावा
 • Kadba Kutti Machine योजनेसाठी सर्वप्रथम तुम्हाला Mahadbt च्या वेब पोर्टलवर जावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून Login करावे लागेल.
 • लॉगीन केल्यावर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • यानंतर कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.
 • यानंतर जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या समोर एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर Open होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती तुम्हाला निवडावी लागेल.
 • मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडला पाहिजे.
 • यानंतर तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये ट्रॅक्टर चालीत अवजारे हा पर्याय निवडा.
 • यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नसतो.
 • यानंतर यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज & ग्रास हा पर्याय निवडा.
 • यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास हा पर्याय निवडा लागेल.
 • प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
 • सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व Upto 3 असे पर्याय तुमच्यासमोर दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
 • अशा पद्धतीने तुम्ही Kadba Kutti Machine साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Kadba Kutti Machine Scheme अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

निष्कर्ष

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासोबत Kadba Kutti Machine Scheme या योजनेबद्दल माहिती शेअर केली आहे.तसेच तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ कसा घेउ शकता याची संपुर्ण माहिती दिली आहे. तसेच तुम्ही कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज कसा करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत अशी सर्व माहिती आम्ही आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. धन्यवाद.

हे पण वाचा: 👇🏻