नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये Pik Vima News संबंधित माहिती जाणून घेणार आहोत.बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची आगाऊ रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या बातमी मुळे आपत्तीचा फटका बसलेल्या पन्नास लाख शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळणार आहे.
शेती करत असताना विविध प्रकारच्या आपत्ती शेतकऱ्यांना उद्भवतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जर Pradhanmantri Pik Bima Yojana मध्ये सहभाग नोंदवलेला असेल तर शेतीत झालेल्या नुकसान भरपाई ची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात येते.पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये ही विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, कीड रोग, चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी अशा प्रकारच्या संघटनांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते.
पावसाचा पडलेला खंड व यात जर पावसाचा खंड २१ दिवसापेक्षा जास्त काळाचा असेल व यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास शेतकऱ्यांना 25टक्के नुकसान भरपाई अग्रीम पीक विम्याच्या स्वरूपामध्ये देण्यात येते.
दररोज कृषी योजना संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि WhatsApp Group मध्ये सामिल व्हा..!👈🏻
आपल्या राज्यातील एकोनपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकर्यांसाठी एकूण 2,086 कोटी 54 लाख रुपये इतका आगाऊ पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्याचे वाटप सुरू पण झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 35 हजार 358 शेतकर्यांचा आगाऊ पीक विमा म्हणून 18 कोटी 39 लाख रुपये इतका पीक वीमा सरकारद्वारे मंजूर करण्यात आला असून, ही रक्कम आता सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
Pik Vima News 2023
बुलढाणा जिल्ह्यात 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘एल्गार महामोर्चा’ आणि अन्नत्याग आंदोलनानंतर मंत्रालयावर ताबा मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मुंबईला गेले होते. रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार महामोर्चा आंदोलनाची यापूर्वी हाक दिली होती.
या दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मित्र रविकांत तुपकर यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सह्यांद्री अतिथीगृहात बैठक झाली होती.या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
सह्यांद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हिवाळी अधिवेशनापूर्वी आगाऊ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी या गोष्टीचा सुध्दा समावेश होता. यामुळे आगाऊ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पिक वीमा यादी 2023-24
पिक विमा यादी 2023-24 ही शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा हा बँकेमार्फत भरला आहे, ती यादी जाहीर झालेली आहे. पिक विमा यादीत शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्याची संपूर्ण माहिती मिळेल.
पिक विमा यादी कशी पहायची?
पिक विमा Crop Insurance Scheme 23-24 Maharashtra यादी बघण्यासाठी शेतकऱ्यांनी CSC Center अथवा आपले सरकार महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अथवा बँकेमध्ये जाऊन संबंधित पीक विम्याची यादी बघू शकता.
पीक वीमा यादी पाहण्यासाठी तुम्हाला Crop Insurance Scheme च्या Official Website वरती जावे लागेल आणि तेथून स्वतःच्या गावाची यादी select करून Download करावी लागेल. खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पीक विमा यादी डाऊनलोड करून घ्या.
येथे क्लिक करा
FAQ’s- पिक विमा यादी
Q.1- पिक विमा यादी कशी पहायची?
Ans- पिक विमा Crop Insurance Scheme 23-24 Maharashtra यादी बघण्यासाठी शेतकऱ्यांनी CSC Center अथवा आपले सरकार महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अथवा बँकेमध्ये जाऊन संबंधित पीक विम्याची यादी बघू शकता.
Q.2- किती रुपयांचा पीक विमा मंजूर झाला?
Ans- आपल्या राज्यातील एकोनपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकर्यांसाठी एकूण 2,086 कोटी 54 लाख रुपये इतका आगाऊ पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्याचे वाटप सुरू पण झाले आहे.
Q.3- अग्रिम पीक विम्यात किती टक्के अनुदान मिळते?
Ans- पावसाचा पडलेला खंड व यात जर पावसाचा खंड २१ दिवसापेक्षा जास्त काळाचा असेल व यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास शेतकऱ्यांना 25टक्के नुकसान भरपाई अग्रीम पीक विम्याच्या स्वरूपामध्ये देण्यात येते.
निष्कर्ष:
आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासोबत Pik Vima News संबंधित माहिती शेअर केली आहे.तसेच आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये पिक विमा यादी 2023 कशी पहावी या संबंधीत माहिती दिली आहे. जर तुम्हाला आमच्याकडून दिलेल्या माहितीचा फायदा झाला असेल तर हा मेसेज आपल्या जवळील शेतकरी मित्रांना नक्की पाठवा.
हे पण वाचा 👇🏻
- आयटीआय आणि इंजिनियर यांना नोकरीची सुवर्णसंधी जाणून घ्या सविस्तर माहिती.
- कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना अर्ज कसा करावा?
- Cars And Bike Offer