Post Office Scheme : महागाईच्या चिंतेमुळे भविष्यात बचत म्हणून आपल्याजवळ काही रक्कम रहावी आणि आपल्या अडचणीच्या काळात केलेली बचत उपयोगी पडावी, यासाठी बचतीचे महत्व खूप वाढले आहेत. सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून टपाल खात्याच्या (Post Office) अनेक योजनांना गुंतवणूकदारांनी अधिक पसंती दिली आहे.
पोस्ट ऑफिसच्या काही योजनांवर नागरिकांचा भरोसा असल्याचं सिद्ध झालं आहे. मनी 9 ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या भरपूर प्रमाणात वाढताना दिसत आहे हे सर्वेक्षणात समोर आले आहे. 2022 मध्ये 70 टक्के कुटुंब बचत करीत होते. आता हा आकडा 2023 मध्ये 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. हाच आकडा 2024 मध्ये अजून वाढताना दिसेल.
Post Office Scheme
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह उत्कृष्ट परतावा देखील बघायला मिळतो. सरकारने सध्या पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. ज्याअंतर्गत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळत आहे.
पोस्टाची अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना आहे. हि योजना खासकरून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेवरील व्याजदर वार्षिक 7.2% टक्क्यांवरून ते 7.5% टक्के केला आहे. म्हणजेच या योजनेत तुम्ही जर गुंतवणुक करत असाल तर तुमचे पैसे काही दिवसातच दुप्पट होतील. चला तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
(KVP)किसान विकास पत्र योजना काय आहे?
Kisan Vikas Patra Yojana: ही योजना भारत सरकार द्वारे चालत आहे. या योजनेत तुम्ही निश्चित वेळेत तुमची गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करू शकता. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. तसेच येथे जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
किती दिवसात पैसे दुप्पट होणार?
किसान विकास पत्र योजना या योजनेअंतर्गत तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला 9 वर्षे आणि 7 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर या कालावधीत ही रक्कम दुप्पट होइल म्हणजेच ₹2 लाख रुपये होईल. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते, म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळत आहे.
यापूर्वी, या योजनेअंतर्गत पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागत होते पण, आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2023 मध्ये याचा कालावधी कमी करून 120 महिने केला आणि काही महिन्यांनंतर, नागरीकांना या योजनेचा अधिक लाभ देण्यासाठी सरकारने हा कालावधी 115 महिने केला आहे.
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक किती करावी लागणार?
किसान विकास पत्र या योजनेत तुम्ही ₹100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला एक आणि संयुक्त खाते उघडता येते. या योजनेमध्ये Nominee सुविधा देखील उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP (किसान विकास पत्र योजना) या योजनेत खाते उघडू शकतात.
किसान विकास पत्र योजनेत खाते कसे उघडावे?
किसान विकास पत्र योजनेत खाते उघडणे खूप सोपे आहे. किसान विकास पत्र योजनेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह एक अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रोख रक्कम, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये राशी जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्र सुध्दा जोडावे लागेल.
किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना आहे. दर तीन महिन्यांनी सरकार आपल्या व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार यात बदल करत असते.