PM Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलर पंप योजना मिळवा ९५% अनुदानअर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

Kusum Solar Pump Yojana: शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची योजना म्हणजेच पीएम कुसुम सोलर पंप योजना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत. Kusum Solar Pump Yojana काय आहे या योजनेचे फायदे, या योजनेसाठी पात्रता, कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी अनुदान किती मिळते इत्यादी सर्व गोष्टीची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.

PM Kusum Solar Pump Yojana: पीएम कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती
PM Kusum Solar Pump Yojana: पीएम कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

कुसुम सोलर पंप योजना म्हणजे काय?

Kusum Solar Pump Scheme: आपल्या भारतात अजून पण असे काही ग्रामीण भाग आहेत ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही. वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधवांना शेतीतील पिकांना पाणी देण्याकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अश्या भरपूर प्रकारच्या कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील उत्पन्न पाहिजे तेवढे निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकरी बांधवांकरिता महत्वाची योजना म्हणजेच PM Kusum Solar Pump Yojana राबवली आहे.

कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सोलर कृषी पंप मिळणार आहेत. सोलर पंप च्या साहाह्याने शेतकरी बांधव वीज नसतांनाही त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देऊ शकतील. सरकारच्या या सोलर पंप योजनेमुळे शेतकरी बांधवांना खूप मोठी मदत मिळणार आहे.

Kusum Solar Pump Scheme Details

योजनेचे नावकुसुम योजना महाराष्ट्र
योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली महाराष्ट्र सरकार /केंद्र सरकार पुरस्कृत
योजना कधी सुरू झाली 2020
या योजनेचा लाभ कोणाला मिळेलराज्यातील पात्र शेतकरी
योजनेचा उद्देश्यएक प्रकारे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
वर्ष2023-24
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Kusum Solar Scheme Details

कुसूम सोलर पंप योजनेचे लाभार्थी

  1. शेतकरी
  2. सहकारी संस्था
  3. शेतकर्‍यांचा गट
  4. जल ग्राहक संघटना
  5. शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे (Scheme Benefits)

कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे (Scheme Benefits)
कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे (Scheme Benefits)
  • कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अतिशय कमी खर्चात Solar Pump मिळणार आहे. 
  • या योजनेअंतर्गत 10 लाख पेक्षा अधिक सोलर पंपाचे सौरिकरण केले जाणार आहे.
  • कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वीज निर्मिती होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सोलर पंप बसवण्यासाठी 60% ते 90% टक्के आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत 30% टक्के आर्थिक मदत बँकेद्वारे दिले जाणार आहे.
  • Kusum Solar Pump साठी शेतकरी बांधवांना फक्त 10% टक्के रक्कम भरायची आहे.
  • ज्या राज्यांमध्ये कमी पाऊस आहे किंवा सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही त्या भागात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना PM Kusum Yojana Maharashtra चा लाभ मिळणार आहे
  • Solar Plant बसविल्यानंतर तुम्हाला 24 तास विज उपलब्ध होणार आहे यामुळे शेतातील पिकांना पाहिजे तेव्हा तुम्ही पाणी देऊ शकता.
  • Solar Plant ची वीज शेतकरी बांधव त्यांच्या इच्छेनुसार सरकारी किंवा खाजगी विज पुरवठा विभागाला विकू शकतो.

या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात

PM Kusum Solar Pump योजनेसाठी पात्रता (Eligibility Criteria)

  • पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करणारा प्रत्येक शेतकरी भारताचा नागरीक असणे आवश्यक आहे.
  • पीएम कुसुम या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शेतकरी गट, सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादन संघटना, पाणी ग्राहक संघटना इत्यादींचा लाभ मिळणार आहे.
  • शेतकरी बांधवांकडे प्रति मेगा वॅटनुसार (Mega Watt) 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी बांधवाकडे खाली नमूद केलेले सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (Aadhar Card)
  2. जातीचा दाखला (Caste Certificate)
  3. बँक पासबुक (Bank Passbook)
  4. रेशन कार्ड
  5. नोंदणी प्रत
  6. प्राधिकरण प्रत
  7. बँक अकाऊंट स्टेटमेंट
  8. पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
  9. ७/१२ सातबारा उतारा त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद असणे आवश्यक आहे.
  10. जर सामायिक सातबारा असेल तर, 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भोगवटदराचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

कुसुम सोलर पंप योजना ऑफिसिअल वेबसाईट

PM KUSUM (MNRE) Official Website https://pmkusum.mnre.gov.in
PM Kusum Maharashtra GRGR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kusum Solar Pump Yojana Apply Process | या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

PM Kusum Solar Pump Yojana Apply Process | या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
PM Kusum Solar Pump Yojana Apply Process | या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
  • PM Kusum Solar Pump Yojana अर्ज करण्यासाठी या योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या नवीन पेजवर तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज करण्याचा पेज ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला सर्व आवश्यक ती माहिती भरणे गरजेचे आहे. तुम्हाला नवीन किंवा बदलणारा डिझेल पंप हवा असल्यास, तसे त्या पेजवर सूचित करा.
  • यानंतर तुमची शेतजमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जिल्हा निवडा, तसेच तालुका आणि गावाची नावे द्या.
  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि समोर दिलेल्या पर्यायांमधून तुमची जात-संबंधित माहिती निवडा.
  • सर्व माहिती प्रविष्ठ केल्यानंतर तुम्हाला Email I’d द्यावी लागेल ती ईमेल आयडी जतन करा.
  • E-mail I’d जतन केल्यानंतर Next पर्यायावर क्लिक करा यानंतर पुढील पानावर, तुमच्याकडून १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येईल ते १०० रूपये नोंदणी शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
  • नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुमच्या मोबाइल वरती एक Username I’d आणि Password पाठवला जाईल, या Username I’d आणि Password द्वारे तुम्ही या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी वापरू शकता.
  • यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशा पद्धतीने तुम्ही PM Kusum Solar Pump Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या शेतकरी दाखला कसा काढतात.

सोलर पंप किंमत / लाभार्थी हिस्सा

सोलर पंप क्षमतासोलर पंप किंमतसामान्य श्रेणी (लाभार्थी हिस्सा)SC/ST श्रेणी (लाभार्थी हिस्सा)
3 HP1,93,803₹19,380₹9,690₹
5 HP2,69,746₹26,975₹13,488₹
7.5 HP3,74,402₹37,440₹18,720₹
सोलर पंप किंमत / लाभार्थी हिस्सा

PM Kusum Solar Pump Application Fees (अर्ज फी)

शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याकरिता 5000/- रू. प्रती मेगावॅट दराने अर्ज फी आणि 18%GST भरावा लागतो. अर्ज फी राजस्थान रिन्यूएबल एनर्जी कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपात देण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता अर्ज फी वॅटनुसार आकारली जाते ती अर्ज फी खालीलप्रमाणे आहे –

अ.नं.अर्ज फी
01)2500+GST – 0.5 मेगावॅट
02)5000+GST – 1 मेगावॅट
03)7500+GST – 1.5 मेगावॅट
04)10,000+GST – 2 मेगावॅट
PM Kusum Solar Pump Application Fees (अर्ज फी)

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी किती अनुदान मिळते?

पीएम कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी बांधवांसाठी 90% ते 95% अनुदान देत आहे. शेतकरी बांधवांना फक्त 5% ते 10% रक्कम भरावी लागणार आहे.

  1. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 60% टक्के अनुदान देईल.
  2. कुसुम सोलर पंप साठी केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 30% टक्के रक्कम कर्ज स्वरूपात देईल.
  3. कुसुम सोलर पंप साठी शेतकरी बांधवांना फक्त 10% टक्के रक्कम भरावी लागेल.

शासनाचा मोठा निर्णय आता नागरिकांना ई -रेशन-कार्ड मिळणार

PM कुसुम सोलर पंप अर्जाची यादी कशी पहायची?

PM कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव बघण्याकरीता सर्वात आधी, तुम्हाला पीएम कुसुम सोलर पंप योजनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर कुसुम नोंदणीकृत कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करावे लागेल, क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर Open होईल.या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

सोलर पंप योजना हेल्पलाइन नंबर –

या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा इतर माहिती हवी असेल त्यासाठी खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.

Contact Number011-24360404, 011-243600707
Toll Free Number 18001803333
सोलर पंप योजना हेल्पलाइन नंबर

या यादीत नाव नसेल तर 12 हजार रुपये मिळणार नाही? त्वरित पहा.

🪀 दररोज नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा

✅ WhatsApp ग्रुपजॉईन करा

Telegram चॅनेल
जॉईन करा
Join WhatsApp &Telegram Group

📌 कृपया लक्ष दया – कुसूम योजनेच्या नावाने फसव्या Website पासून सावध रहा-

  • मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, प्रधानमंत्री कुसुम योजनाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट Website पासून सतर्क रहा.
  • बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये बनावट वेबसाईट नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana.com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.
  • यामुळे पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला मंत्रालयामार्फत देण्यात आला आहे. ही योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत पीएम कुसुम योजना राबविली जात आहे.

FAQ’s- PM Kusum Solar Pump Yojana

चला जाणून घेऊयात लोकांद्वारे PM Kusum Solar Pump Yojana संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे-

Q.1- कुसुम सोलर पंप योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो?

Ans- कुसुम योजनेच लाभ शेतकरी, शेतकऱ्यांच्या गट व शेतकरी उत्पादक संघटना इत्यादी लाभ घेऊ शकतात.

Q.2- कुसुम सोलर पंप योजना काय आहे?

Ans- कुसूम सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून, या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानावर सौर ऊर्जा सोलर पंप दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बिना लाईट पाणी सौर पंप द्वारे देऊ शकतात.

Q.3- कुसुम सोलर योजनेसाठी किती जमीन आवश्यक आहे?

Ans- कुसूम सोलर पंप या योजनेअंतर्गत कमीत कमी मेगावॅट नुसार सुमारे 2 ते 2.5 एकर जमिनीची आवश्यकता आहे.

Q.4- पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी किती अनुदान मिळते?

Ans- पीएम कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी बांधवांसाठी 90% ते 95% अनुदान देत आहे. शेतकरी बांधवांना फक्त 5% ते 10% रक्कम भरावी लागणार आहे.

Q.5- PM कुसुम सोलर पंप अर्जाची यादी कशी पहायची?

Ans- PM कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव बघण्याकरीता सर्वात आधी, तुम्हाला पीएम कुसुम सोलर पंप योजनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर कुसुम नोंदणीकृत कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करावे लागेल, क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर Open होईल.या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

निष्कर्ष

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासोबत PM Kusum Solar Pump Yojana बद्दल माहिती शेअर केली आहे.तसेच या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता या योजनेसाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात या योजनेचे फायदे काय आहेत अशी संपुर्ण महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे समजून सांगितली आहे.

आमच्याद्वारे कुसूम सोलर पंप योजना बद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना देखील ह्या लेखाची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेचा त्यांनाही फायदा होईल.धन्यवाद.