रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी,राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा!

व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा. Join Now

Anandacha Shidha: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Aanandacha Shidha
Aanandacha Shidha

दिवाळी,दसरा आणि गुढीपाडवा यांसारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजवंत शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येतो आता २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

या आनंदाच्या शिधामध्ये काय काय मिळणार?

या आनंदाच्या शिधामध्ये साखर, खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असतील.या सहा वस्तू अवघ्या १०० रुपयांमध्ये दिल्या जाणार आहेत. आनंदाचा हा शिधा राज्यातील सुमारे १ कोटी ६८ लाख शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.यात १ किलो साखर,१ लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहे प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तूंचा समावेश या आनंदाचा शिधामध्ये असेल.

हा आनंदाचा शिधा कोणाला मिळणार?

राज्यातील अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) आणि केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.