ISRO Bharti 2024 (Technician – B Post): Indian Space Research Organisation (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) म्हणजेच इस्रोमध्ये (ISRO) आपणास नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ISRO Bharti 2024 (Technician – B Post)
इस्रोने टेक्निशियन-बी पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी isro.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे शेवटच्या संधीची वाट न पाहता वेळीच अर्ज जमा करा आणि या अमूल्य संधीचा फायदा घ्या.
दहावी पास असणाऱ्यांसाठी हि मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही मोठी मेगा भरती आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. उमेदवारानी अजिबातच वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रिेयेसाठी त्वरित अर्ज करावा. ही दहावी पास उमेदवारांसाठी एकप्रकारे मोठी संधी आहे.
हे पण वाचा: मारुती सुझुकीच्या या 05 कार स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी
ISRO Bharti 2024: इस्त्रो मध्ये नोकरी करणे म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांना थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी मिळत आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी नक्की अर्ज करावीत.
इस्रोकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इस्रो भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला isro.gov.in. या साईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तरपणे माहिती मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.
उमेदवारांनो कृपया लक्ष द्या हि भरती फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराचा आयटीआय कोर्स होणेही आवश्यक आहे. आपण नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत हे व्यवस्थितपणे उमेदवाराने तपासावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला वयाची अट ठेवण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
ISRO Bharti Technician B Post : महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली तारीख : 09 डिसेंबर 2023
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 31 डिसेंबर 2023
ISRO Recruitment Technician B Post : भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
इस्रोच्या या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज दाखल करु शकतात जाणून घ्या-
इस्रोच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा असणे आवश्यक आहे. Diploma झाला असेल तर हा डिप्लोमा NCVT द्वारे मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे. इस्रोच्या या भरती राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरसाठी उपलब्ध आहेत.
ISRO Recruitment Technician B Post : वयोमर्यादा (Age Limit)
इस्रोच्या या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच पात्रता संबंधीत इतर तपशील तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनेवरून तपासू शकता.
ISRO Recruitment Technician B Post : निवड कशी होईल?
या भरतीसाठी निवड करण्यासाठी लेखी परीक्षा (Written Test) आणि कौशल्य चाचणीद्वारे (Skill Test) उमेदवारांची निवड करण्यात येईल.
ISRO Recruitment Application Fees: अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्जाची फी ₹100 रुपये आहे. सुरुवातीला सर्व उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. या भरतीसाठी एकूण 54 पदे भरण्यात येणार आहेत.
ISRO Recruitment 2023 : किती पगार मिळेल?
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये मासिक वेतन मिळेल. यासोबतच केंद्र सरकारच्या (Central Government) नियमांनुसार अनेक भत्तेही दिले जाणार आहेत. पदानुसार पगाराची श्रेणी सुध्दा बदलू शकते. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे चांगले होईल आणि त्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. कारण इस्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुम्हाला मिळत आहे आणि विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे. यामुळे इस्रोमध्ये एक प्रकारची ही बंपर भरतीच निघाली आहे.
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/epHJZ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.isro.gov.in/ |